Monday, 16 January 2017

💝प्रेम 💝

💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥

      ....प्रेम....

भावना समजायला,
फक्त शब्द नाही बरं
ह्रदय ही असावे लागते...!
शब्दांत तर ताकद
असतेच भिडण्याची..!
पण...!
ते शब्द पचवायला,
आपल्या अंतरात ओतायला..!
अंतरीची तळमळ लागते...!
तेव्हाच त्या शब्दांना,
अर्थ येतो,
भावना येतात,
अन् नकळत जुळून जातात...!
त्याच भावनांना प्रेम म्हणतात,
त्याच भावनांना प्रेम म्हणतात...!

------------✍🏻गजेंद्र
      🌷ढवळापुरीकर औरंगाबाद🌷

💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥

No comments:

Post a Comment