**************************
*कवी विचार मंच आयोजित*
*काव्य स्पर्धेसाठी*
**************************
*विषय:-तिरंगा* (अष्टाक्षरी)
*************************
माझा तिरंगा तिरंगा
लहरतो किती छान,
हृदयात अभिमान
माझ्या काळजाचा प्राण,
माझा तिरंगा तिरंगा
लहरतो किती छान.....||धृ||
उजळला भारत हा
उजळल्या दाही दिशा
गर्व मज सांगतो मी
मज स्वातंत्र्याची नशा
सांडलेल्या रक्ताचे हे
आहे स्वातंत्र्य महान
माझा तिरंगा तिरंगा
लहरतो किती छान.....||1||
सदा फडकत राहो
माझ्या देशाचा हा ध्वज
निस्वार्थ भावना माझ्या
निर्मळ ठेवावे मज
जपेन या हृदयात
माझ्या तिरंग्याची शान
माझा तिरंगा तिरंगा
लहरतो किती छान.....||2||
रक्त हुतात्म्यांचे होते
धरेवर सांडलेले
स्वातंत्र्याच्या समरात
बलिदान किती गेले
देशाच्या रक्षणासाठी
ज्वलंत ठेवू संग्राम
माझा तिरंगा तिरंगा
लहरतो किती छान.....||3||
अजून दुश्मन बघा
तिरंग्यावर जळतो
रंग तिरंग्याचा पहा
मनास त्याच्या छळतो
खवळलेल्या डंखाची
राखण तिरकमान
माझा तिरंगा तिरंगा
लहरतो किती छान.....||4||
✍🏻गजेंद्र
ढवळापुरीकर
औरंगाबाद
**************************
*कवी विचार मंच आयोजित*
*काव्य स्पर्धेसाठी*
**************************
*विषय:-तिरंगा* (अष्टाक्षरी)
*************************
माझा तिरंगा तिरंगा
लहरतो किती छान,
हृदयात अभिमान
माझ्या काळजाचा प्राण,
माझा तिरंगा तिरंगा
लहरतो किती छान.....||धृ||
उजळला भारत हा
उजळल्या दाही दिशा
गर्व मज सांगतो मी
मज स्वातंत्र्याची नशा
सांडलेल्या रक्ताचे हे
आहे स्वातंत्र्य महान
माझा तिरंगा तिरंगा
लहरतो किती छान.....||1||
सदा फडकत राहो
माझ्या देशाचा हा ध्वज
निस्वार्थ भावना माझ्या
निर्मळ ठेवावे मज
जपेन या हृदयात
माझ्या तिरंग्याची शान
माझा तिरंगा तिरंगा
लहरतो किती छान.....||2||
रक्त हुतात्म्यांचे होते
धरेवर सांडलेले
स्वातंत्र्याच्या समरात
बलिदान किती गेले
देशाच्या रक्षणासाठी
ज्वलंत ठेवू संग्राम
माझा तिरंगा तिरंगा
लहरतो किती छान.....||3||
अजून दुश्मन बघा
तिरंग्यावर जळतो
रंग तिरंग्याचा पहा
मनास त्याच्या छळतो
खवळलेल्या डंखाची
राखण तिरकमान
माझा तिरंगा तिरंगा
लहरतो किती छान.....||4||
✍🏻गजेंद्र
ढवळापुरीकर
औरंगाबाद
**************************
No comments:
Post a Comment