🌹माझी मोठी बहीण🌹
लग्न करून ताई माझी
गेली हो सासरी
भेटले ना तीला कधी
सुख या संसारी
नित्य रिकामी मला
दिसे सुखाची ओसरी
आठवता मी मजला
हुंदका ना आवरी…….(1)
बहीण आमची मोठी
आम्ही होतो लहान
सदाच होती आमच्यावरती
मातृत्वाची शान
सासरी असुन भावांचा
नित्य तीला अभिमान
दुर राहून आमच्यासाठी
पेटवायची रान……(2)
संसाराला ताईच्या
ग्रहण लागले नव-याचे
क्षणक्षण देत गेला तो
दुःख अतिव वेदनांचे
सांगितले न आंम्हा
कधी वागणे त्या ढोराचे
ति म्हणे उजळायचे
नशीब माझ्या पोरांचे….. (3)
सतत ऐकी तो नराधम
बोलने अपमानास्पद
बाप आमचा स्वर्गामधे
म्हणून होती फरफट
आम्ही लहान असल्याने
सहन करी त्याची लत
नाव बापाचे जपायला
जगत होती रोज कुढत..(4)
अशा प्रेमळ बहीणीचा
अंत वाईट झाला😢
दहा वर्षांपूर्वी आम्हांस
एकटे करून गेला
दुःख घायाळ करते
भाऊबीज व राखीला
आठवण छळते ताईची
मज क्षणाक्षणाला…..(5)
ताई तुझ्या नंतर मुलाचा
वनवास खुप झाला
बाप म्हणणाराच त्यांचा गं
वैरी बघ का निघाला
आज एक माझ्याकडे
एक तिकडेच रहायला
तुझ्या सोनुचा *(मुलीचा)* संसार
आम्ही सुखाचा करवून दिला.(6)
सावत्रपणाचा रोग हा
वाढतोच आहे अजून
बेचैन होते गं मन ताई
आजही तुझ्या वाचुन
वाट पाहतो मी तुझी
तु येशील का परतून..
आठवणीत तुझ्या अश्रू
पाझरते या नयनांतून.😢.(7)
ये ना ताई हात माझा बघ
सुना तुझ्या राखीव वीणा
भाऊबीज सण देखील जातो
देऊन मज वेदना
तुझ्या माघारी ताई माझी
*भाचीच झाली बहीण*
तुझ्यावरती खुप कविता
मी दिवसेंदिवस लिहीन….. (8)
---------------*गजेंद्र काळे*
9623714011
*(ढवळापुरीकर औरंगाबाद)*
No comments:
Post a Comment