***************************
*स्पर्धेसाठी*
***************************
*विषय:-स्वप्नांचे आकाश*
*(बालगीत)*
***********************छेडे*टिप. लहान मुलाचे मन समोर ठेऊन कविता लिहीली आहे*
लहान आमच्या नयनी दिसे स्वप्नांचे आकाश
मोठे होऊन संस्कारी होऊ आहे हा विश्वास
लहान आमच्या नयनी दिसे स्वप्नांचे आकाश..||धृ||
लहान म्हणूनी कुणी छेडे
उत्तर तयांचे तेथेच मिळे
मुर्ती लहान अन् किर्ती महान
शब्दांचे उत्तर तेथेच कळे
बोबड्या बोबड्या ओठांमधला बोबडा
हा आभास.
लहान आमच्या नयनी दिसे स्वप्नांचे आकाश..||1||
स्वच्छ सुंदर निर्मळ मनाचे
हेवेदावे आम्हा नसती कुणाचे
जे थिरकले या हृदयावरती
तालावर त्या थय थय नाचे
जगण्यासाठी नव्या दमाचा मिळतो नवा प्रवास.
लहान आमच्या नयनी दिसे स्वप्नांचे आकाश..||2||
भविष्य उद्याचे आम्ही गडे
संस्काराचे गिरवू पाढे
समाज मनाला चंचलतेचा
वारसा मिळो हे साकडे
लक्ष लक्ष दिव्यांनी उजळावा बालमनी प्रवास.
लहान आमच्या नयनी दिसे स्वप्नांचे आकाश..||3||
------------------✍🏻गजेंद्र
(ढवळापुरीकर)
औरंगाबाद
****************************

No comments:
Post a Comment