Friday, 6 January 2017

😢आई तुझ्या जाण्याने😢

*आई तुझ्या जाण्यानं मी पोरकी झाले*
*आज खर्या अर्थाने मी माहेराला*
*परकी झाले ग.....||धृ||*

*माझा जन्म झाला तेव्हा तु*
 *मनातुन खुलली होतीस गं,*
*माझ्यही मुलींच्या लग्नांची स्वप्न*
*रंगवुन ठेवली होतीस गं.*
*मायलेक या शब्दांतुन मी*
*आज एकटीच राहीले गं......*
*आज खर्या अर्थानं मी माहेरला*
*परकी झाले गं........||१||*

*माझ्या लग्नाची स्वप्न पाहुन*
*ती पुर्णही केलीस तु,*
*लावुन हळद माझ्या अंगाला*
*मुक्तही झालीस तु,*
*आई सप्तपदी चालुन मी*
*सासरी आले गं.......*
*अन् खर्या अर्थानं मी माहेरला*
*परकी झाले गं.......||२||*

*आई मी जेवत होते अन्*
*दादाचा निरोप आला,*
*आई गेली म्हणताच माझ्यावर*
*दुःखाचा डोंगर कोसळला,*
*कशी कमनशिबी मी तुझ्या*
*वाचुन अधुरी झाले गं......*
*आज खर्या अर्थानं मी माहेरला*
*परकी झालेग गं......||३||*

*आई मुलं माझी तुझ्यासाठी*
*धाय मोकळुन रडली गं,*
*माय...म्हणत हबंरडा फोडुन*
*माझ्या गळ्यात पडली गं.*
*आई तुझ्या वाचुन माझी दुनिया*
*हलकी झाली गं......*
*आज खर्या अर्थानं मी माहेरला*
*परकी झाले गं........||४||*

*आई आता बाबांना समजावनं*
*खुप जड जाईल गं*
*कारण त्याचं प्रेम जन्मभर*
*तुझ्या प्रेमाची वाट पाहील गं.*
*बाबांची दुनिया माझ्या नजरेत*
*निर्दयी झाली गं.....*
*आज खर्या अर्थानं मी माहेरला*
*परकी झाले गं.......||५||*

                           
                            *कवी:गजेंद्र*
                           *(औरंगाबाद)*

*दोन वर्षांपूर्वीच्या सत्यघटनेवरील रचना*आई

No comments:

Post a Comment