ती सध्या काय करते
मनास माझ्या श्वास भरते
जगण्याचे बळ देते आणि
माझी अर्धागिंनी होते
ती सध्या हेच करते......
ती सध्या काय करते
घरास माझ्या घरपण आणते
जगण्याचे नियम शिकवते
आणि सुखदुःखात भागिदार होते
ती सध्या हेच करते.......
ती सध्या काय करते
माझ्या नावाचे कुंकू लेते
माझ्या मुलांचा सांभाळ करते
पोटाला दोन प्रेमाचे घास देते
ती सध्या हेच करते......
ती सध्या काय करते
माझ्या संसाराला साथ देते
माझी सहचरिणी होते
निर्विवाद हक्क माझ्यावर सांगते
ती सध्या हेच करते.......
ती सध्या काय करते
लढण्याची हिम्मत आणि बळ देते
माझ्या जीवनाची ढाल होते
माझ्यावर स्वच्छ सुंदर प्रेम करते
ती सध्या हेच करते.......
ती सध्या हेच करते.......
-
-------------------*कवी:-गजेंद्र*
मनास माझ्या श्वास भरते
जगण्याचे बळ देते आणि
माझी अर्धागिंनी होते
ती सध्या हेच करते......
ती सध्या काय करते
घरास माझ्या घरपण आणते
जगण्याचे नियम शिकवते
आणि सुखदुःखात भागिदार होते
ती सध्या हेच करते.......
ती सध्या काय करते
माझ्या नावाचे कुंकू लेते
माझ्या मुलांचा सांभाळ करते
पोटाला दोन प्रेमाचे घास देते
ती सध्या हेच करते......
ती सध्या काय करते
माझ्या संसाराला साथ देते
माझी सहचरिणी होते
निर्विवाद हक्क माझ्यावर सांगते
ती सध्या हेच करते.......
ती सध्या काय करते
लढण्याची हिम्मत आणि बळ देते
माझ्या जीवनाची ढाल होते
माझ्यावर स्वच्छ सुंदर प्रेम करते
ती सध्या हेच करते.......
ती सध्या हेच करते.......
-
-------------------*कवी:-गजेंद्र*
No comments:
Post a Comment