Monday, 2 January 2017

📚✏तुम्ही सावित्रीच्या लेकी...✏📚

तुम्ही सावित्रीच्या लेकी
हाती   तुमच्या  लेखणी
किती  वर्णू   गं  महिमा
सांगा   सावित्री  चरणी.....!.... (1)

स्रीस शिक्षणाची त्यांनी
मुहूर्त     मेढ     रोवली
वारसा   पुढे   नेण्याची
शक्ती  तुम्हास मिळाली.....!.... (2)

आज  वचन  पाळा  गं
सावित्री  महिमा जाणा
या  तुमच्या  लेखनीचा
आहे   धारदार   बाणा.....!.... (3)

वात्सल्याचं   जगणं   हे
माया     ममतेचं    रूप
लेखनी    मधे    साठवा
माझ्या  सावित्रीला खुप.....!....(4)

सावित्रीनं    जे     पेरलं
तेच    रूजवा    बियाणं
रूढी    परंपरा    सा-या
टाका    मातीत    गाडूनं....!... (5)

हाती  शस्त्र  या  उचला
तुम्ही  सावित्रीच्या लेकी
उद्धार    या   जीवनाचा
हीच     करेल    लेखनी....!....(6)

---------📚गजेंद्र काळे📚
      ढवळापुरीकर(औरंगाबाद)








No comments:

Post a Comment