Tuesday, 3 January 2017

👭मैत्री ही दोघांमधली.👬

काही दिवसांपुर्वि मला
एफबीवर एक मित्र भेटला,
बोलण्या वरून मला
मैत्रीत त्याच्या अर्थ वाटला.....1

हळूहळू मग मैत्रीत
ओळख जास्तच वाढत गेली,
त्याची दुःख मी माझ्या
मनापासून ह्रदयात साठवत नेली.........2

भेट आम्हा दोघांची
यापूर्वी कधीच झालेलि  नव्हती,
मैत्री तर दिवसेंदिवस
वाढत बहरत चाल्लेली होती.....3

पण वेड्या मनास
कळलं नाही तो मतलबी होता,
काही पैशांसाठी
मैत्रीला या टिकवु पाहत होता....4

मी चांगल्या श्रीमंत
घरातून आहे असं त्याला वाटलं,
मी काय त्याला सांगू
माझं तर नशीबच होतं फाटलेलं....5

जेव्हा कळलं त्याला
माझ्या आणि माझ्या गरीबी बद्दल,
काय सांगू मित्रहो
मला कळण्या आधीच दूर लोटलं....6

मित्रहो सांगाणा
मित्र हा श्रीमंतच असायला हवा का,
पैसाच असेल सर्वकाही
तर सांगा पैशांतच मित्र शोधावा का...7

मी नाही पैशांत
अन् मित्रांत अंतर ठेवणार कधी,
अगोदर सांगेण
गरीब समजूनच जागा दे ह्रदयामधी...8

मैत्री ही निस्वार्थ
असावी दोघांच्याही ह्रदयामधली,
प्रेम आणि आदराने
फुलून बहरावी मैत्री ही दोघांमधली....9

                  कवी:-गजानन कचरु काळे
                             ढवळापुरीकर
                         मो:-9623714011
                             संभाजीनगर

No comments:

Post a Comment