Monday, 2 January 2017

👬मित्र 👭

मित्र असतात फुलपाखरा सारखे,
आलेच मनात तर यायचे.....!
नाहितर भुुर्रकण उडुन जायचे.......

जीवनही आहे त्याच सारखे,
आलेच सुख तर उपभोगायचे,
नाहीतर आहे ते दु:ख सोसायचे......

जेव्हा गरज असते आपल्यांची,
ते खुपच दुर असतात,
ह्रदयात असुनही आपल्या,
मैलोंमैल दुर का भासतात........

मित्र चुकतात कि चुकते मैत्री,
हे का शोधत बसायचं,
शोधुन काही सापडत नाही,
बस आपल्या जीवनाला शोधत,
आयुष्याला नविन आकार देत पुढे जायचे....
अन् हे जीवन जगायचे.........

                           •गजेंद्र  काळे•
                        🌺9623714011🌺
                        (औरंगाबाद)

No comments:

Post a Comment