Monday, 2 January 2017

वेडे तुझाच होण्याची वाट पाहिन..!

जीवन जगता जगता त्यालाही नवं वळण मिळतं...
मनही सैरावैरा धावु लागतं..,
नभाच्या निळसर छायेत या मला तुझं प्रेम मिळतं...
थांब मि येणार आहे न विसरता...
तुझ्यासाठी..थोडीसी वाट पहा...
उशिर झाला तरी येइन तुला मिठीत घेण्यासाठी..
तुला प्रेम देण्यासाठी...
तुझं थोडंसं प्रेम घेण्यासाठी....
सांग कितीही संकटे आली तरी तु माझा हात
सोडणार नाहीस,
ओठांवरचे रंग तुझे माझ्यासाठी तु हरवणार नाहीस....
मी वचन देतो तुला..
तुलाही उशिर झाला तरी मी जाणार नाही...
तुला एक नजर पाहील्या शिवाय मी मरणार नाही...
तुझ्या सहवासाचा गंध मला हवा आहे,
तुझ्यात मला गुतांयचय, तुझ्यासाठी जगायचंय...
माझी ओळख विसरुन तुझ्या ओळखित हरायचंय...
हे आयुष्य...तुझं आहेे तुलाच देइन,
तुजसाठी वेडा होइन...
तु नाही आलीस तरी, फक्त तुुझाच राहीन..
तुझ्या येण्याची वाट पाहीन...
मग पुर्ण आयुष्य गेलं तरी चालेल.....
पण.....वेडे तुझाच होण्याची वाट पाहीन.....!!!!!!
     
                                     .....गजेंद्र काळे....
                                        ढवळापुरीकर
                                      ता.जि.औरंगाबाद..

No comments:

Post a Comment